शहरातील आग विझवनारा अल्पवयीन मुलांना चटके देत असेल तर ? हे लोक कसे संरक्षण देणार?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : आरोग्य अधिकारी अत्याचार करत असेल , शहरातील आग विझवनारा अल्पवयीन मुलांना चटके देत असेल तर नगर शहराला हे लोक कसे संरक्षण देणार? त्यांच्यावर कारवाई करून यांची हकालपट्टी करावी.

अशी मागणी मनसेचे नितीन भुतारे यांनी महापालिका आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे. महानगरपालिकेतील आरोग्य अधिकारी अनिल बोरगे, अग्निशमन प्रमुख शंकर मिसाळ,

तसेच घाटविसावे व महानगर पालिकेतील नर्स यांच्यावर अल्पवयीन मुलावर अत्याचार करण्याबाबत गुन्हा दाखल होतो म्हणजे नगर शहर संकटात आले आहे .

महानगर पालिकेची अब्रू या लोकांमुळे चव्हाट्यावर आली असून, सर्व महाराष्ट्रात महानगर पालिकेची बदनामी झाली आहे. कोरोनाच्या काळात आरोग्याची जबाबदारी सोडून हा आरोग्य अधिकारी अल्पवयीन मुलाला चटके देतो,

मारतो ,जीवे मारण्याचा प्रकार हे अधिकारी करतात व या वर आपण ताबडतोब कारवाई करणे गरजेचे आहे. वेळा याच अधिकाऱ्यांना झाकन्यायचा प्रकार महानगर पालिका ,काही अधिकारी, काही संघटना,

काही राजकारणी लोक करतात म्हणून हे अधिकारी अश्या प्रकारे माज दाखवत आहेत. त्यामुळे आपण ताबडतोप या लोकांची हकालपट्टी करा अन्यथा मनसे कधीही येऊन आपल्याला चपला चा हार घालेल याची नोंद आपण घ्यावी.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24