आता या मुलाला काय बोलावं ? स्वत:च्या घरातून केलय त्याने ‘असं’ काही ..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- वडील नाशिक येथे रुग्णालयात असल्याचा फायदा उठवत मुलाने इतर दोघांच्या मदतीने घराचे कुलूप तोडून ३ लाख १२ हजार किमतीचा ऐवज लांबवला.

ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजता मालदाड रोड येथील एमएससीबी कॉलनीत घडली. आईच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला.

मंगल संजय डमरे यांचे पती आजारी आहेत. मुलगा आशिषने इतर दोघांच्या मदतीने संगमनेरला येऊन घराचे कुलूप तोडून १ लाख २० हजारांचे सोन्याचे गंठण, ७५ हजारांची सोनसाखळी,

८७ हजार ५०० रुपयांचे कानातील झुबे व रिंग, २५ हजारांची दुचाकी, ५ हजाराचे मोबाइल पाॅवरबँक व घड्याळे असा ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला. पोलिसांनी आशिष संजय डमरे, सूरज वाघ, निकिता वाघ यांच्यावर गुन्हा दाखल केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24