अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- नगर जिल्हा रुग्णालय अग्नीकांड प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा याच्या जामीन अर्जावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी न्यायालयामध्ये आक्षेप घेतला.
जाधव यांनी यासंदर्भात हरकती नोंदवत थर्ड पार्टी अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. या अर्जावर सरकारी वकील व आरोपींच्या वकिलांना आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश येथील जिल्हा न्यायाधीश एम. आर. नातू यांनी दिले आहेत.
त्यामुळे याप्रकरणी पुढील सुनावणी आता २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. डॉ. पोखर्णा यांना न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज मंजूर केला आहे. न्यायालयाने तपासी अधिकारी यांना या संदर्भामध्ये म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते.
त्यावर बुधवारी सुनावणी होणार होती. गिरीश जाधव यांनी डॉ. पोखरणा यांना जामीन देताना आमच्या म्हणण्याचा विचार करावा, असा अर्ज व काही पुरावे लेखी स्वरूपामध्ये न्यायालयात सादर केले.
तर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांनी या घटनेचा तपास करायचा आहे. काही कागदपत्रे हस्तगत करायचे आहेत, त्यामुळे पाच दिवसांची मुदत मागितली. त्यामुळे न्यायालयाने मंगळवारी सुनावणी ठेवली आहे.