शेतकरी संकटात असताना आमदार लहू कानडे फिरकले देखील नाहीत !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी अतिवृष्टीच्या अस्मानी संकटामुळे पयर्त कोसळला आहे. देवळाली प्रवरा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या उभ्या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या नुकसानीचे तातडीने महसूल यंत्रणेमार्फत पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शहाजी कदम यांनी दिला आहे.

दरम्यान, शेतकरी संकटात असताना श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार लहू कानडे हे शेतकर्‍यांकडे फिरकले देखील नाहीत, अशी खंत शेतकर्‍यांनी व्यक्त करत त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

तालुक्यात एकूण 620 मिलिमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. एकट्या देवळाली प्रवरा येथे बुधवारी 82 मिमी. विक्रमी पाऊस झाला आहे.

देवळाली प्रवरामध्ये काही दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे.

या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने कुठे शेतात पाणी साचले. तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले.

त्यामुळे शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. उभ्या पिकांचे तातडीने महसूल यंत्रणेमार्फत पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. तशी मागणी देखील परिसरातील शेतकर्‍यांमधून होत आहे.

काही शेतकर्‍यांनी आपल्या पिकांचे पीकविमा केलेले आहेत. मात्र विमा कंपनीचे कोणतेच अधिकारी या शेतकर्‍यांकडे लक्ष देत नसल्याने तेथेही कोणतीही मदत शेतकर्‍यांना मिळताना दिसत नाही.

राहुरीच्या तहसीलदारांनी याबाबत तातडीने दखल घेऊन महसूल यंत्रणेमार्फत सर्व उभ्या पिकांचे पंचनामे करून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याचा तातडीने प्रयत्न करावा.

अन्यथा शेतकर्‍यांना आपल्या न्यायहक्कासाठी आंदोलन करावे लागेल. असा इशारा कदम व शेतकरी संघटनेचे नेते संदीप खुरूद यांनी दिला आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24