अहिल्यानगर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील अष्टविनायक गणपतीपैकी एक असलेल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराजवळ काहींनी अनधिकृतपणे प्रार्थनास्थळ उभारून हा भाग वक्फ बोर्डाचा असल्याचा दावा केला होता. याबाबत आ. संग्राम जगताप यांनी प्राशासनास लक्ष घालून सदर अनाधिकृत अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने याची दखल न घेतल्याने आ. जगताप यांनी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी निवडक कार्यकत्यांसह सिद्धटेक गाठले.
जिथे येईल अली, तिथे येईल बजरंगबली
आ. संग्राम जगताप व हिंदू गर्मरक्षक सागर बेग यांच्या नेतृत्वाखाली शेकडो हिंदुत्ववादी कार्यकत्यांनी गणपती मंदिरासमोरील अनधिकृत अतिक्रमणावर हातोडा मारला यावेळी आ. जगताप यांनी स्वतः हातात दंडुका घेत ते अतिक्रमण पाडले.यावेळी जय श्रीराम… जय बजरंगबली…. जिथे येईल अली, तिथे येईल बजरंगबली…. अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
कर्जत तालुक्यातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धटेक मंदिराजवळ काही दिवसांपूर्वी अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. या अनधिकृत बांधकामानंतर येथील प्रार्थनास्थळी एका समाजाकडून पुजाही सुरु करण्यात आली होती.
अनधिकृत अतिक्रमणावर हातोडा
ही बाब लक्षात येताच येथील ग्रामस्थांनी हिंदुत्ववादी संघटना तसेच आ. संग्राम जगताप यांना याबाबत कळविले. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना व आ. जगताप यांच्याकडून संबंधित अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यासंदर्भात प्रशासनाला कळवले होते. परंतु त्यानंतर देखील या अतिक्रमनाविरोधात कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आ. संग्राम. जगताप यांनी आक्रमक भूमिका घेत हिंदुत्वबादी संघटनांच्या कार्यकत्यांसह गुरुवारी सिद्धटेक गणपती मंदिरासमोरील त्या अनधिकृत अतिक्रमणावर हातोडा चालवत संबंधित अतिक्रमण जमीनदोस्त केले.
त्यांना जशास तसे उत्तर – आ. जगताप
यावेळी माध्यमांशी संवाद सांगताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, ज्या-ज्या ठिकाणी अशा पद्धतीची अनधिकृत बांधकामे असतील ते प्रशासनाने काढावे. अन्यथा आम्ही ते स्वतः काढू, जिल्ह्यात काही गटांकडून हिंदुंच्या गार्मिक स्थळांजवळ अशा प्रकारचे अनधिकृत कृत्य करण्याचे प्रकार वाढत आहेत. ते हिंदू धर्माच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे. आता आम्ही हे सहन करणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा आ. जगताप यांनी दिला.
घटनास्थळी तगडा पोलिस बंदोबस्त
सिद्धटेक येथे गणपती मंदिराबाहेर असलेल्या त्या विवादित जागेवरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रस निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देखील कोणताही त्रास होऊ नये याची देखील यावेळी दक्षता घेण्यात आली
प्रशासनाला आली ऐनवेळी जाग
दरम्यान आ. जगताप व हिंदुत्ववादी संघटनांकडून या अनधिकृत प्रार्थनास्थळावर कारवाई करण्यासंदभांत कळविले होते. तरी कुठलीही कारवाई न करणाऱ्या स्थानिक प्रशासनाला ऐनवेळी जाग येत दोन दिवसांपूर्वी संघटना आक्रमक झाल्याचे समजताच संबंगित अतिक्रमणातील प्रार्थनास्थळाला ऐनवेळी सेंदूर लावत तिथे नवनाथांची प्रतिमा ठेवली. परंतु गुरुवारी आलेल्या कार्यकत्यांनी संबंधित अतिक्रमण जमीनदोस्त केले