महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यातील सर्व महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली आणि शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रची जुळवा जुळवा करत फार्म भरून देण्यासाठी सेतू केंद्रात अंगणवाडी सेविकांकडे एकच गर्दी केली. शेतातील खुरपणी असो की कपाशी लागवड असो महिलांमध्ये एकच चर्चा लाडक्या बहिणीचा फार्म भरला का ?
ग्रामीण भागातील महिला देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेत सहभागी होण्यासाठी तत्पर झाले आहेत.
महिलांचा या योजनेसाठीचा लाभ घेण्यासाठी दिसून येणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ही योजना निश्चितच महिलांच्या रष्टीने दिलासादायक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय महिलांच्या दृष्टीने फलदायी ठरणारा आहे.
बहुतांश महिलांनी या योजनेसाठी कागदपत्रांची पूर्तता केली असली तरी ज्या महिला भगिनींनी एसटी वराच्या प्रवासामध्ये अर्धे तिकीट किंवा नंतरच्या काळात मोफत प्रवास योजनेचा लाभ मिळावा म्हणून आधार कार्डवर ६५ वर्ष वय करून घेतले आशा महिलांची मात्र मोठी घोर निराशा या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने झाली आहे.
अशा महिलांची संख्या देखील काही कमी नाही परंतु शासनाने नेमकी ६५ वर्षापर्यंतच्या महिलांनाच लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार असल्याचे घोषित केल्याने एसटी प्रवासासाठी ६५ वर्षे वय करून घेतलेल्याची घोर निराशा यामुळे झाली आहे.