Ahmednagar News : राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात चौथी विखे पाटील कुटुंबातील पिढी काम करत आहे. सत्ता वा नसो नागरिकांशी बांधीलकी कायम राहिली आहे. सरकारमध्ये असताना जे जे खाते मिळाले,
त्याचे सोने करून विकासकामाचा डोंगर उभा करताना गट-तटाचे राजकारण केले नसल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी केले. राहाता तालुक्यातील चितळी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणी साठवण तलाव व पाण्याची टाकी सुमारे दोन कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेचे व सव्वापाच कोटी रुपये विविध विकास कामाचे भूमिपूजन व उदघाटनप्रसंगी शालिनीताई विखे बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी भाऊसाहेब वाघ होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य अॅड. अशोकराव वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य कविता लहारे, पंचायत समितीच्या सदस्य अर्चना लहारे, माजी उपसभापती अलकाताई वाघ, चितळीच्या उपसरपंच कविता पगारे, अॅड. अशोकराव वाघ, खासदार सुजय विखे पाटील मंचचे अध्यक्ष शैलेश वाघ,
राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पठारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गुंजाळ, चव्हाण, इंजिनिअर घापटकर, पाणीपुरवठाचे पिसे, वाघमारे, बचत गटांच्या रुपाली वाघ, सेवा सोसायटीच्या नंदाताई वाघ, सेवा सोसायच्या चेअरमन रेवनाथ वाघ, व्हा. चेअरमन संदीप वाघ,
माजी उपसरपंच सोनाली वाघ, विलास वाघ, ग्रामपंचायत सदस्य राजू वाणी, सुवर्णा माळी, दत्तात्रय सुसरे, विक्रम वाघ, सोनाजी पगारे, आ. आशुतोष काळे प्रतिष्ठानचे दीपक वाघ, नंदू गायकवाड, रवींद्र वाघ, रमेश वाघ, सुभाष वाघ, बाळासाहेब वाघ, सोपान वाघ, रमेश वाघ,
शिवाजी कदम, रुपेश गायकवाड, रमेश जाधव, जीवन वाघ, मजिनाथ वाघ, सुरेश वाघ, संभाजी तनपुरे, सुभाष तनपुरे, अनिल वाघ, बाळासाहेब माळी, सतीश गायकवाड, ग्रामविकास अधिकारी मधुकर आंग्रे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक पत्रकार विष्णू वाघ यांनी तर सूत्रसंचालन सेवा सोसायटीचे संचालक रेवनाथ वाघ यांनी केले. आभार पत्रकार अशोक वाणी यांनी मानले.