शहर झपाट्याने वाढत असताना विकासात्मक व्हिजनने कार्य सुरु -आमदार संग्राम जगताप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-शहर झपाट्याने वाढत असताना विकासात्मक व्हिजनने कार्य सुरु आहे. उपनगरांच्या विकासासाठी निधी खर्च केला जात असून, बोल्हेगाव उपनगर अत्यंत झपाट्याने विकसीत झाला आहे. प्रभाग 7 मध्ये नगरसेवक कुमार वाकळे यांच्या पाठपुराव्याने अनेक विकासकामे मार्गी लागून एक मॉडेल प्रभाग म्हणून पुढे आला असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

बोल्हेगाव उपनगरातील प्रभाग क्र.7 मधील साईराजनगर परिसरातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक तथा माजी सभागृहनेते कुमार वाकळे, नगरसेवक संपत बारस्कर, नगरसेवक अ‍ॅड. राजेंद्र कातोरे, नगरसेवक सागर बोरुडे, मदन दिवटे, उत्तमराव अडसूळ, कल्पना गुंजाळ, संजय राऊत, आदिनाथ म्हस्के, देवेंद्र गवस, अनिता सोनवणे, वैभव शेवाळे, रमेश वाकळे, सनी वाकळे, शरद महापुरे, निवृत्ती उंडे, संजय कडूस,

मोहन पडोळे, समाधान मोरे, विकी बोरा, भाऊसाहेब काळे, मुन्ना शेख, गोरख खाडे, अशोक गवांदे, संदीप गहिले, रामा काते, कांतीलाल जगताप, सुनील भालेराव, रवींद्र साठे, मोहन पडोळे, शेषराव बडे, शरद ढमाले, विशाल पवार, शुभम शिर्के, शरद देवरे, रवींद्र खेडकर, अविनाश काळे आदिंसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे आमदार जगताप म्हणाले की, प्रभाग 7 मध्ये मुलभूत नागरी सुविधा पुरविण्यात आल्याने नागरिक देखील समाधानी आहेत.

जेथे विकासात्मक कामे होतात त्या प्रभागाचा झपाट्याने कायापालट होऊन नागरी वस्ती वाढत असते. वाकळे यांनी स्वत: लक्ष देऊन प्रभागातील सर्वच प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहिले आहेत. कोरोनाच्या संकटकाळात राहिलेले काही प्रश्‍न देखील लवरकरच सोडविण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. नगरसेवक कुमार वाकळे म्हणाले की, खराब झालेल्या रस्त्यामुळे नागरिकांना अडचणी येत होत्या.

मात्र नागरिकांचा हा प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले आहे. प्रभाग 7 मध्ये विकास कामे करण्यासाठी आपण सदैव कटिबध्द राहिलो असून, प्रभागाचा विकासात्मक कायापालट झाला आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शहरात सर्वाधिक निधी प्रभाग 7 मध्ये खर्च करण्यात आलेला आहे. नगरसेवक कितीही पाठपुरावा करणारा असला तरी निधी देणारा विकासात्मक दृष्टीचा असला पाहिजे. संग्राम जगताप यांनी विकासात्मक दृष्टी ठेऊन प्रभाग 7 बरोबरच बोल्हेगाव उपनगराचा मोठ्या छपाट्याने विकास होण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.

साईराजनगर परिसरातील मोहोळकर घर ते उत्तमराव अडसूळ घर ते कल्पना गुंजाळ घर ते भाऊसाहेब काळे यांच्या घरा पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण व डांबरीकरण काम हाती घेण्यात आले आहे. रस्त्याचा प्रलंबीत प्रश्‍न सोडविल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आमदार संग्राम जगताप व नगरसेवक कुमार वाकळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24