अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील गुंडांवर अंकुुश ठेवण्यासाठी तालुक्यातील सर्व प्रशासकिय कार्यालये बंद ठेउन हल्ल्याचा निषेध नोंदविला पाहिजे. तसे केले तरच पुन्हा असे धाडस कोणी करणार नाही. आपण गप्प बसलो तर काळ आपणास माफ करणार नाही.
तालुक्यात चालणा-या अवैध व्यवसायांना वरदहस्त कोणाचा असा सवाल करून पोलिस प्रशासनाने रात्रीचे पेट्रोलिंग वाढवून वाळूसह चालाणारे अनेक अवैध व्यवसाय बंद करणे गरजेचे आहे.
कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही व तालुक्याची प्रतिमा खराब होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज असल्याचे नारायणगव्हाण येथील सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमुद केले आहे.
थोर स्वातंत्रसेनानी सेनापती बापट व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या विचाराने पारनेर तालुक्याला नवी दिशा मिळाली असून तालुक्याचे नाव प्राधान्याने उल्लेखिले जात आहे.
तालुक्यात देशहितासाठी प्रेरणादायी चळवळी उभ्या करून समाजहित जोपासले जात असताना तालुक्याच्या तहसिलदार ज्योती देवरे यांच्या वाहनावर वाळूचा ट्रक घालण्याचा झालेला प्रकार तालुक्याच्या विचारांना, प्रतिमेला तडा देणारा आहे.
अशा प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी तालुक्यातील सर्व प्रशासकिय कार्यलये बंद ठेवण्याची गरज असल्याचे पवळे यांचे मत आहे. खुर्चीचा मोह न ठेवता, जिवाची पर्वा न करता तहसिलदार ज्योती देवरे या कोरानाच्या महामारीतून नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.
तालुक्यासाठी योगदान देणारांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहण्याची प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. तालुक्यात कोणाचीही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, तसेच सर्वसामान्य जनतेसाठी योगदान देणारांना जनता वा-यावर सोडणार नाही असे पवळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमुद केले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved