Shrigonda News : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खरातवाडी येथील तुळशीदास महाराज मंदिरात दि. २३ रोजी चोरी केली होती. यात स्पीकरचे युनिट, तीन लाऊड स्पीकरचे साऊंड, व फिटिंगची केबल असा एकूण सात हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता.
या प्रकरणी बेलवंडी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे समांतर तपास करत मुद्देमालासह एकाला ताब्यात घेतले. अतुल अर्जुन जाधव (रा. खरातवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २३ रोजी खरातवाडी येथील तुळशीदास महाराज मंदिरातून लाऊड स्पीकरचे युनिट, तीन लाऊड स्पीकरचे साऊंड, व चार हजार रुपयांची फिटिंगची केबल असा एकूण सात हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला.
या मंदिरात गावकऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला असल्याने चोरी करणारा चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. अधिक तपास करत पोलिसांनी खरातवाडी येथील अतुल अर्जुन जाधव याला ताब्यात घेत चोरुन नेलेला मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस कर्मचारी आर.टी शिंदे, शिपणकर, विनोद पवार, संदीप दिवटे, सतीश शिंदे, संदीप शिंदे, भांडवलकर, सुरेखा वलवे यांनी केली.