यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरेंच्या हत्येमागे कुणाचा हात?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांचा खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात त्यांच्यावर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केले होते. रेखा जरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली. त्यांना तातडीने अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. रेखा जरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या.

जरेंनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी यशस्विनी महिला ब्रिगेड ही संघटना स्थापन केली होती. दरम्यान जरेंच्या हत्येमागे कुणाचा हात आहे. याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, त्यांच्या हत्येने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रेखा जरे या त्यांचा मुलगा आणि आई तसेच डॉ. माने या पुण्याहून काम उरकून येत असताना जतेगाव घाटात ही घटना घडली.

कारची काच एका दुचाकीला लागल्यामुळे वाद झाला. त्या वादातूनच रेखा जरे यांच्या मानेवर वार करण्यात आले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती जरे यांच्या मुलाने पोलिसांना दिली आहे.

दुचाकीवर दोन जण होते. ते नेमके को होते, याबाबत अधिक तपशील अजून मिळालेला नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाबाबत पुढील तपासणी सुरू आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24