गावचा कारभारी कोण आज ठरणार; मतमोजणी होणार १८ जानेवारीला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-महाराष्ट्र राज्यातील १४ हजार ग्रामपंचायती मध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला होता. कधी नाही ते या वेळेस मोठ्या हाय व्होल्टेज लढाया या निवडणुकी मध्ये पाहावयास आपल्याला मिळाल्या. आज या १४ हजार ग्रामपंच्यातींसाठी मतदान होणार आहे.

मतदार राजा कोणाला मतदान करतो याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. सत्ताधारी पक्ष व विरोधी भाजप यांच्यातच मुख्य लढत आहे असे म्हणायला हरकत नाही. आज तब्बल १,२४,८११ जागांसाठी राज्या मध्ये मतदान होणार आहे.

या वर्षी दरवेळेस बिनविरोध असणाऱ्या आदर्शगाव राळेगण सिद्धी व हिवरे बाजार येथे सुद्धा जिरवा जिरवी मुळे निवडणूक लागली आहे. या ग्रामपंचायतींकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीच्या माध्यमाने महाविकास आघाडी ची प्रतीक्षा पणाला लागली आहे आणि विरोधी पक्ष सुद्धा या मुळे तावा तावात मैदानात उतरला आहे.

या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे गावाकडून स्थलांतरित होऊन मुंबई – पुणे येथे जाणाऱ्या मतदारांना आण्यासाठी व त्यांच्या कडून मतदान करून घेण्यासाठी विशेष बस तसेच त्यांच्या जेवण ची सोय करून त्यांच्या कडून मतदान करून घेतले जात आहे.

अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकी मध्ये कोणत्या पक्षाचा बोलबाला ठरतो हे बघण्यास सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24