तु माझ्या पत्नीला मेसेज का करतो असे म्हणत त्याने….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- तु माझ्या पत्नीला मेसेज का करतो असा जाब तक्रारदार सौरभ गोरक्षनाथ देठे यांनी नालेगावातील दातरंगे मळ्यात आरोपी अजय शेळके यास विचारला.

जाब विचारल्याचा राग येवून आरोपी अजय शेळके, शुभम शेळके, सौरभ शेळके, पुजा कांबळे, सुगा कांबळे रा .सर्व सिध्दार्थनगर यांनी देठे यास कुर्‍हाडीच्या तुंब्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

पत्नीला मेसेज केल्याने नालेगावात राडा झाल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.

तोफखाना पोलीसांनी दंगलीच्या गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पो.हे.कॉ. गाजरे हे करत आहेत. ही घटना सोमवारी दि. 3 रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24