यापुढे शेतात गांजा पिकवायचा का? शेतकरी संतप्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तसेच या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा अक्षरश सडला आहे.

उर्वरित कांद्याला चांगला भाव मिळेल, सावकाराचं कर्ज फेडता येईल आणि कुटुंबाची गाडी रुळावर येईल, अशी स्वप्नं पाहत असतानाच कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेत केंद्र सरकारने कांदा उत्पादकांच्या स्वप्नांचा चुराडा केला.

त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट उसळी आहे. आम्ही यापुढे शेतात गांजा पिकवायचा का, असा सवाल राज्यातल्या संतप्त कांदा उत्पादकांमधून उपस्थित केला जातोय.

कांद्याच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवता यावं, यासाठी केंद्र सरकारनं कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. परिणामी कांद्याचे भाव पुन्हा एकदा गडगडले.

एकीकडे निसर्गाच्या प्रकोपाने हतबल झालेल्या बळीराजाला केंद्र सरकारच्या अशा निर्णयामुळे जगणं कठीण झालं आहे. अशा दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकर्‍यांनी शेतात गांजा पिकवायचा का, अशी विचारणा कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24