अहमदनगर बातम्या

‘रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणार’

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : नगर पुणे महामार्गावरील नारायणगव्हाण चौपदरीकरणासाठी सुरु असलेल्या उपोषणास आमदार निलेश लंके यांनी भेट देवून जिल्हाधिकारी यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी यांना संपर्क साधत उपोषणाची मध्यस्थी केली.

जिल्हाधिकार्यालयाकडून प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यानंतर सचिन शेळके यांच्यासह ग्रामस्थांचे उपोषण आमदार निलेश लंके व सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांच्या हस्ते लिंबू सरबत देवून उपोषण सोडण्यात आले.

नगर पुणे महामार्गावरील नारायणगव्हाण गावच्या प्रलंबित चौपदरिकरण व गावाच्या सुरक्षिततेसाठी सचिन शेळके यांसह ग्रामस्थांनी दि.११ मार्च रोजी गावात उपोषण सुरू केले होते. रस्त्याचे ९४५ पैकी ८१५ मीटरचे काम केले परंतु उर्वरीत काम प्रलंबित होते.

सदर रस्त्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द केला होता. परंतु रस्त्याचा प्रस्तावात त्रूटी असल्याचे भूसंपादन विभागाकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे तिढा सुटत नव्हता त्यामुळे उपोषणाची तिव्रता लक्षात घेवून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने प्रस्तावात दुरुस्त्या केल्या परंतु प्रशासनाकडून वेळकाढूपणा सुरू होता.

त्यामुळे आंदोलकोनी मोजणीसाठी भूसंपादनासाठी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्यांच्या मार्फत प्रस्ताव भूमिअभिलेखला द्यावा व महमार्गावरील संपादीत होणाऱ्या क्षेत्राचा योग्य मोबदला ग्रामस्थांना देण्यात यावा. यासाठी आग्रही भूमिका ठेवली होती. आंदोलनकर्त्यांची प्रकृती ढासळत असताना ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत प्रशासनाचा निषेध केला आंदोलनस्थळी पंचक्रोशितील ग्रामस्थासह राजकीय मंडळींनी भेट दिली होती.

उपोषणाला ५ दिवस उलटुनही कार्यवाही होत नव्हती यातच आमदार निलेश लंके यांनी येवुन संबंधित विभागांना फोन लावत परिस्थितीचे गांभिर्य सांगताच अधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्तावाच्या दुरुस्त्या केल्यात्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रांतधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

त्यानंतर आंदोलन मागे मागे घेतले. यावेळी सरपंच मनिषा जाधव, चेअरमन बाळासाहेब चव्हाण, दादासाहेब शेळके, तानाजी पवळे, रामदास जाधव, गणेश शेळके, अर्जुन वाल्हेकर, लक्ष्मण शेळके, संपत जाधव, धोंडीबा गायकवाड, हौसिराम कुदळे यांसह महिला विद्यार्थी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office