अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे मानवी वस्तीवर हल्ले वाढल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. तसेच ग्रामीण भागांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. यामुळे अनेक शेतीचे कामे रखडली जात आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी विजेचा प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन केले होते. याच मुद्यावर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला आहे.
नागरिकांनीही बाहेर पडताना, शेतात जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. बिबट्यांना पकडण्यासाठी अधिक पिंजरे प्राप्त करून घेण्यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्याचबरोबर, शेतकर्यांना रात्री शेताला पाणी देण्यासाठी जावे लागते. त्यामुळे शेतीसाठी रात्री ऐवजी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
बिबट्याच्या भीतीमुळे शेतकर्यांना रात्री शेतात जाणे टाळले जावे, यासाठी शेतीला दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved