शरद पवारांना दिलेला शब्द पाळणार, आ. नीलेश लंके दुपारी राजीनामा देणार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडी आता अत्यंतर वेगवान झाल्या आहेत. पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके आपल्या आमदारकीचा राजीनामा आज (दि.२९) दुपारी देणार असल्याची माहिती समजली आहे.

तर दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी हा राजीनामा देत व त्यांच्या आग्रहाखातर नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोधात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याची कार्यकर्त्यांत चर्चा आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा शुक्रवारी दुपारी सुपा येथील आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत होऊ शकते.

मागील काही दिवसांपासून या निवडणुकीत खा. सुजय विखे यांच्या विरोधात राणी लंके की आमदार नीलेश लंके उतरणार या चर्चा झडत होत्या. अखेर आमदार लंके यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर करत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याचीच माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पवार साहेबांना दिलेला शब्द पाळणार

देशाच्या राजकारणाच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांना मानणारा मी कार्यकर्ता असून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा शब्द मी त्यांना दिला होता.

तो शब्द अखेर मी पाळला असून पवार कुटुंबीय हे माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे आमदार निलेश लंके यांनी म्हटले आहे अशी माहिती काही कर्त्यांकडून समजली आहे.