पुढील पाच वर्षांसाठी एक ग्रॅमही दुधाची भुकटी आयात करणार नाही : केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे आश्वासन

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : सध्या राज्यात पडलेल्या दुध दाराच्या मुद्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. नगर जिल्यातील अकोल्यात दूध दर वाढवण्यासाठी आंदोलन उपोषण सुरु आहे. दरम्यान दूधाचे दर वाढवण्याऐवजी दूध पावडर आयात करत असल्याच्या बातम्या पसरवण्यात आल्या.

मात्र पुढील पाच वर्षांसाठी एक ग्रॅमही दुधाची भुकटी आयात करणार नाही असे आश्वासन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी नुकतेच दिले. केंद्रीय सहकार मंत्र्यांच्या या आश्वासनामुळे यामुळे विरोधकांनी पेरलेल्या चुकीच्या बातम्यांना चांगलीच चपराक बसली आहे.

नुकतेच पुण्यात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाच्या समारोपाच्या वेळी बोलत होते. सध्या राज्यात दुधाच्या दरावरून विरोधकांनी राजकारण तापवले आहे. शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करून सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र आखले होते.पण केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या आश्वासनाने विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.

दुग्धविकास मंत्री विखे पाटील यांनी नुकताच दुधाला शासकीय अनुदानासह दुधाला सरसकट ३५ रुपये भाव जाहीर केला आहे. दुध भुकटीच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी १० हजार मॅट्रिक टन भुकटीवर ३० रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर दुधाला हमी भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला असून त्याला केंद्र सरकारने सकारात्मता दाखवली आहे. यामुळे त्याबाबतही लवकरच कायदा केला जाईल असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

सध्या एकीकडे दुधाचे भाव मोठ्या प्रमाणात पडले असून दुसरीकडे पशुखाद्याचे भाव मात्र मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुधाचे भाव वाढवण्याची मागणी केली होती. मात्र सहकारी व खासगी दूध संकलन केंद्र चालकांनी त्यास नकार दिल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

केंद्र सरकारने दूध भुकटी आयतीचा निर्णय रद्द करावा यासाठी मंत्री विखे पाटील यांनी केंद्राला पाठपुरावा केला होता. आणि या संदर्भात वारंवार खुलासा करून दिशाभूल न करण्याचे आवाहन केले होते.

परंतु विरोधकांनी याचे राजकारण करून दूध प्रक्रिया प्रकल्पामध्ये सुद्धा चुकीच्या पद्धतीने राजकारण करण्यास सुरुवात केली होती. पण केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या आश्वासनाने दूध उत्पादक शेतकरी आणि दूध प्रक्रिया केंद्राना मोठा दिलासा मिळणार आहे. असे मत मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केले.

 

Ahmednagarlive24 Office