विकासकामात मागे पडणार नाही – नामदार प्राजक्त तनपुरे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-  पाथर्डी तालुक्यातील मिरी-तिसगाव या रस्त्याचे सहा महिन्यापूर्वीच काम पूर्ण करण्यात आले आहे. या रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून हे काम पाच वर्षांपूर्वी केलेले आहे की काय असेच प्रवाशांना वाटते.

त्यामुळे या रस्त्याच्या कामाची गुणनियंत्रण विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यापुढील काळात मतदारसंघात निकृष्ट कामे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा शब्दात मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रशासनाला सुनावले.

तालुक्यातील कडगाव येथे वीस लाख रुपये खर्चाच्या कडगाव ते मोहोजबुद्रुक या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण या कामाचे भूमिपूजन मंत्री तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कडगाव येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी मंत्री तनपुरे म्हणाले, सध्या कोरोनामुळे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये महसुली उत्पन्न कमी प्रमाणात जमा होत

असतानाही मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी प्रामुख्याने निधी आणला जातोय. विकासकामात कुठेही कमी पडणार नाही, मात्र आणलेल्या निधीचा सर्वसामान्य जनतेसाठी सदुपयोग व्हावा या हेतूने अधिकारी व ठेकेदार यांनी प्रत्येक काम क्लाॅलिटीचेच करावे, कामाच्या बाबतीत कुठल्या प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही,

अशा शब्दात मंत्री तनपुरे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुनावले. त्याच बरोबर मिरी तिसगाव या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तत्काळ गुणनियंत्रण विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोषींवर निश्चितपणे कारवाई केली जाईल.

मुळा धरणातून सध्या वांबोरी चारीला सोडलेले पाणी हे ओव्हरफ्लेचे आहे, ते बोनस म्हणून घ्या तुमच्या हाक्काचे ६८० एमसीप्टी पाणी अजून सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे तुमच्या हक्काचे ते पाणी तुम्हाला गरज पडेल तेव्हा दिले जाईल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24