अहमदनगर बातम्या

कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची वाढणार डोकेदुखी? कारण की या उमेदवाराला मिळाले…..

Published by
Ajay Patil

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता जोरात सुरुवात झाली असून राज्यामध्ये आता प्रचार सभांचा धुराळा उडताना आपल्याला कालपासून दिसून येत आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक उमेदवारांच्या माध्यमातून आणि पक्षांच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजी आखण्यात आले असून काही करून आपण जिंकायचेच असा निर्धार करून प्रत्येक उमेदवार यामध्ये प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहे.

अशाच स्ट्रॅटेजी चा जर भाग बघितला तर बऱ्याच मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या नावात सारखेपणा असलेला दुसरा उमेदवार निवडणुकीसाठी उभे करण्यात आल्यामुळे अधिकृत उमेदवारांची मात्र यामुळे डोकेदुखी वाढताना दिसून येत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नावात सारखेपणा असल्यामुळे बऱ्याच उमेदवारांना फटका बसल्याचे दिसून आले आहे.

उदाहरणच घ्यायचे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या नावाचा सारखेपणा असलेला उमेदवाराला एक लाखापेक्षा जास्त मतदान झाले होते. आता अशीच काहीशी परिस्थिती कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात दिसून येत आहे.

या ठिकाणी महायुतीकडून भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे व महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विद्यमान आमदार रोहित पवार हे निवडणुकीच्या रिंगणात असून यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे. या विधानसभा मतदारसंघातून 11 उमेदवार सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

सोमवारी विधानसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी महायुतीकडून विखे समर्थक असणारे अंबादास पिसाळ, महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एडवोकेट कैलास शेवाळे हे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलेले होते.

परंतु या दोघांनी अर्ज माघार घेत आपली भूमिका पक्षाच्या सोबत ठेवली.इतकेच नाहीतर मनसेचे रवींद्र कोठारी तसेच रासपचे स्वप्निल देसाई व इतर आठ अशा एकूण 12 जणांनी उमेदवारी अर्ज माघार घेतले व आता अकरा उमेदवार रिंगणात आहेत.

परंतु मुख्य लढत ही भाजपचे आमदार प्रा.राम शिंदे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यात रंगणार आहे. यामुळे आता आमदार रोहित पवार आपला बालेकिल्ला कायम राखतात की प्राध्यापक राम शिंदे त्यांना धोबीपछाड देतात हे आता 23 तारखेला समजेल.

रोहित पवार यांच्या नावात सारखेपणा असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रंपेट चिन्ह
यंदा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये नावात सारखेपणा असणारे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यासह दोन आणि भाजपचे प्रा.राम शिंदे यांच्यासह तीन असे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत.

यामध्ये रोहित पवार यांना तुतारी चिन्ह आहे.परंतु अपक्ष असणारे रोहित चंद्रकांत पवार यांना ट्रंपेट चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे ही बाब नक्कीच आमदार रोहित पवार यांच्यासाठी डोकेदुखी ठरणारी आहे. कारण जर आपण गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बघितले तर याच ट्रंपेट चिन्हांनी जवळपास 44 हजारांच्या पुढे मतदान मिळवले होते.

Ajay Patil