अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-नगर शहर शिवसेनेत निर्माण झालेले वाद संपुष्टात आणुन सर्व गटांचे ऐक्य साधण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे दोन गट एकमेकांचे वाभाडे काढत आहे.
या पार्श्वभुमीवर स्व.अनिल राठोड यांचे सुपुत्र विक्रम राठोड यांनी सर्व गटातटांना एकत्र आणत शिवसेना एकसंघ करण्याचे ठरवले आहे. त्यादृष्टीने आज एक बैठकही झाली.
या बैठकीला माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, गणेश कवडे, संजय शेंडगे, भाऊ बोरूडे, दत्ता कावरे आदी उपस्थित होते.
या बैठकी आधी विक्रम राठोड यांनी फेसबुक वर पोस्ट करीत लवकरच एकसंघ शिवसेना सर्वांना दिसेल असे म्हटले होते. त्यापाठोपाठ ही बैठक झाली. आता दोन्ही गटांच्या संयुक्तिक बैठकीकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved