अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : कोरोनाचा उद्रेक वाढत असलेल्या संगमनेरमधील मोकाट कुत्री टेम्पोत भरून अकोले तालुक्यातील कुंभेफळ, सुगाव, कळस आणि रेडे या चार गावांमध्ये सोडताना एका व्यक्तीला पकडण्यात आले.
या प्रकरणी अकोले पोलीस स्टेशनला प्राण्यांना निर्दयतेने वागवणे या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता अकोलेकर संतप्त झाले आहेत.
संगमनेर येथे पकडलेले कुत्रे जंगलात सोडवायचे म्हणून हे कुत्रे कळस, कुंभेफळ, सुगाव, रेडे या परिसरात सोडण्यात आल्याने ही गावे म्हणजे जंगल आहेत का? असा संतप्त सवाल अकोलेकरांनी केला आहे.
संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीत मोकाट कुत्र्यांचा त्रास नागरिकांना होत असल्यामुळे नागरिकांनी तक्रार केल्यानंतर नगरपालिकेच्या वतीने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची कार्यवाही करण्यात आली.
संबंधित कुत्र्यांना पकडून हद्दीच्या बाहेर नेऊन कुत्र्यांना सोडण्यात येणार होते. सदरचे कुत्रे जंगलात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संगमनेरकरानी या बद्दल नगरपालिकेचे आभार व्यक्त केले.
संगमनेर नगरपालिका हद्दीत पकडण्यात आलेले मोकाट कुत्री जंगलात सोडण्यासाठी ताब्यात घेण्यात आले होते. सदरचे कुत्रेे जंगलात सोडण्यासाठी संबंधित चालकाने अकोल्यातील कळस, कुंभेफळ, रेडे या परिसरात सोडले.
त्यामुळे नागरिकांच्या मनात संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. यासंदर्भात पो.कॉ. गणेश नामदेव शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपीने जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडील आदेश व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43
(1) भारतीय साथ रोग आधिनियम 1897 व सार्वजनिक आरोग्य विभाग यांचेकडील अधिसूचना करोना 2020 प्र. क्रमांक 58 आरोग्य 5 दिनांक 14 /03 /2020 चे अनुषंगाने प्रादुर्भाव रोखण्याच्या तरतुदीनुसार उल्लंघन केले आहे. यासंबंधीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews