Ahmednagar News : तिसगावच्या पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन, उपोषण केले वेळप्रसंगी पंधरा दिवस जेलमध्ये जाऊन बसलो मोठा संघर्षही केला. अनेकांनी तिसगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू म्हणत आमदार खासदार झाले
मात्र तिसगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आद्यपही सुटलेला नाही. आता आमचा जीव गेल्यानंतर तिसगावचा पाणी प्रश्न सोडवणार का अशा शब्दात लवांडे पाटील यांनी आपली खंत यावेळी व्यक्त केली.
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव एक मोठ्या व्यापारी बाजारपेठेचे गाव आहे या ठिकाणी सुमारे पंधरा हजार लोकसंख्या असून गेल्या ४० वर्षापासून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजपर्यंत सुटलेला नाही.
त्यामुळे या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत तिसगावचे माजी सरपंच काशिनाथ पाटील लवांडे यांनी आक्रमक भूमिका घेत लोकप्रतिनिधींना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. लवांडे पाटील यांचा रोख नेमका कोणावर याबाबत आता तिसगावमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे
पाडव्याच्या मुहूर्तावर तिसगाव येथे काही नवीन दुकानांची उद्घाटने झाली, या उद्घाटनांना पाथर्डी शेवगावच्या आमदार मोनिकाताई राजळे आवर्जून उपस्थित होत्या. याप्रसंगी लवांडे यांनी तिसगावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित करत तिसगावच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे डोळेझाक करणाऱ्या नेतेमंडळींना आपल्या खास शैलीत खडे बोल सुनावले.
लवांडे पाटील यांनी ऐन निवडणूक काळातच तिसगावच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून घेतलेली आक्रमक भूमिकेबाबत देखील तिसगावमध्ये आता चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक पाहता लवांडे पाटील यांनी तिसगावच्या पिण्याचे पाण्याच्या प्रश्नासंदर्भात नेहमीच पोट तिडकीने आपली भूमिका व्यक्त केलेली आहे असे असताना देखील तिसगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ४० वर्षात का सुटला नाही याबाबत केवळ लोकप्रतिनिधीकडे बोट करून चालणार नाही याला स्थानिक नेते मंडळीं देखील तितकेच जबाबदार आहेत.
व्यवसायाला महत्त्व द्या राजकारणाला नव्हे
तिसगाव येथे अनेक बाहेर गावच्या लोकांनी मोठ-मोठी व्यावसायिक दुकाने थाटली या व्यवसायाच्या माध्यमातून मोठी धनसंपदा मिळवली आणि त्या माध्यमातून काही व्यावसायिकांना आता राजकीय वेध लागले आहेत.
मात्र त्यांनी व्यवसायातच आणखी वाढ करावी राजकारणाच्या लय भानगडीत पडू नका असा सुचक इशारा लवांडे पाटील यांनी तिसगावमध्ये व्यवसायाबरोबरच राजकारणातही घुसखोरी करणाऱ्या काही व्यावसायिकांना दिला आहे.