अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीजबिलाच्या प्रश्नावरून धुमाकूळ झाला होता. नागरिकांमध्ये महावितरणच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती.
दरम्यान आता सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर महावितरणने वीजचोरांवर धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. मात्र वीजचोरी करणाऱ्याला पकडणाऱ्या वायरमनला मारहाण झाल्याची घटना पारनेर तालुक्यात घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करणारे महावितरणचे कर्मचारी मच्छिंद्र कारभारी बडे (टाकळी ढोकेश्वर) यांना नांदूर पठारचे माजी सरपंच रवींद्र राजदेव यांनी शिवीगाळ करून चपलेने मारहाण केली.
ही घटना सोमवारी घडली. गुन्हा दाखल केला, तसेच हातपाय मोडेन, अशी धमकी देत राजदेवने बडे यांचा मोबाइलही फोडला. दरम्यानमहावितरणने वीजचोरी विरोधात मोहीम उघडली आहे.
तारेवर आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्यांवर बडे कारवाई करत होते. त्याची कुणकुण राजदेव यास लागल्यानंतर तो बडेंकडे गेला.
‘मला विचारल्याशिवाय वसुली कशी करता? गावात आलेच कसे?’ अशी विचारणा करत बडे व त्यांच्या सहकाऱ्यांना राजदेवने शिवीगाळ केली.
बडे यांच्या फिर्यादीवरून राजदेवविरोधात सरकारी कामात अडथळा, तसेच इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा केल्यानंतर राजदेव गावातून पसार झाला.