अहमदनगर बातम्या

अचानक सुटलेल्या ‘त्या’ एकाच गोळीने दोन कुटुंब केले उदध्वस्त..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अचानक सुटलेल्या गोळीने थेट एका शेतकऱ्याच्या डोक्याचा वेध घेतला. मात्र आता त्या सुरक्षा रक्षकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मयत शेतकरी यांचा मुलगा हार्दिक अजित जोशी (रा. श्रीरामपूर) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार शहर पोलिसांनी आरोपी सुरक्षा रक्षक दशरथ कारभारी पुजारी याला अटक केली असून आज सोमवारी पोलीस आरोपीला येथील न्यायालयासमोर हजर करणार आहे. दरम्यान अचानक सुटलेल्या ‘त्या’ एकाच गोळीने मात्र शेतकरी व सुरक्षा रक्षक यांचे कुटुंब उदध्वस्त केले आहे.

शनिवारी सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अचानक गोळी सुटली. ती गोळी अजित विजय जोशी या शेतकऱ्याच्या डोक्यात घुसून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. मृत शेतकरी जोशी हे येथील तालुका प्रगत बागायतदार सोसायटीचे संचालक होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, बहीण, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.

Ahmednagarlive24 Office