अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :अपघातामुळे झालेल्या हॉस्पिटलच्या बीलाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून तेलंगशी या ठिकाणी एक जणावर कुर्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी दोघाजणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तेलंगशी येथील ज्ञानेश्वर केरबा ढाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी तानाजी विठ्ठल पांडुळे व विठ्ठल खेमा पांडुळे (दोघे रा. तेलंगशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 27 रोजी सकाळी तेलंगशी गावातील वेशीजवळ फिर्यादी हा दूध घालण्यासाठी तेलंगशी गावात आला होता. याच दरम्यान फिर्यादी हा वेशीजवळ थांबलेला असताना त्यावेळी वरील आरोपी यांनी फिर्यादीच्या जवळ जाऊन फिर्यादीस म्हणाले की,
तू अहमदनगर येथील हॉस्पिटल मधिल अपघातांमध्ये झालेल्या खर्चाची रक्कम का देत नाहीस. असे म्हणून आरोपी तानाजी पांडुळे याने त्याच्या हातातील कुर्हाडीने फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली.
तसेच आरोपी विठ्ठल पांडुळे यानेही तानाजी याच्या हातातील कुर्हाड हिसकावून घेत त्याच कुर्हाडीने फिर्यादीवर कुर्हाडीने वार करून फिर्यादीच्या छातीवर मारहाण करून गंभीर जखमी केले.
तसेच शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत फिर्यादी हा स्वतः जखमी झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. अवतारसिंग चव्हाण हे करत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews