अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 91 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्चुअल पध्दतीने घेण्यात आली.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सभा संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष तथा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी.बी. नान्नोर व पदसिद्ध उपाध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय ज्ञा.पवार तसेच संस्थेचे माजी चेअरमन नारायणराव पो.तमनर व माजी व्हा.चेअरमन प्रियंका मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी विद्यमान चेअरमन उमेश डावखर, व्हाईस चेअरमन अजय लखापती आदींसह संचालक उपस्थित होते. तर संस्थेचे सभासद ऑनलाइन हजर होते. प्रारंभी पदसिद्ध अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे स्वागत करुन, दिवंगत सभासद व संघटनेचे रा.गो. कर्णिक यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
यानंतर विषयपत्रिकेवरील विषयांची चर्चा सुरु झाली. सभासदांनी विषय पत्रिकेवरील विषयात चर्चा करून आपले विविध प्रश्न मांडले. त्या प्रश्नांना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हळगावकर तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष व उपस्थित पदाधिकारी यांनी उत्तरे देऊन सभासदांना प्रतिसाद दिला.
पदसिद्ध अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी संपूर्ण सभेस उपस्थित राहून सभासदांना सूचना व मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे व्हाईस चेअरमन अजय लखापती यांनीही सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. विषय पत्रिकेतील सर्व विषय संपल्यानंतर माजी चेअरमन नारायणराव तमनर व चेअरमन उमेश डावखर यांची मनोगते झाली. उपस्थितांचे आभार नारायणराव तमनर यांनी मानले.
सभेस श्रीगोंदा शाखा प्रमुख अभिमन्यू घोलवड, शेवगाव शाखा प्रमुख चंद्रकांत पडोळे, श्रीरामपूर शाखा प्रमुख शिवाजीराव तोरणे, संगमनेर शाखा प्रमुख ललित पवार तसेच संचालक शहाराम चेमटे, नवनाथ धोंगडे, शांताराम आवारी, राधाकिसन आभाळे, यादव उदागे, दीपक वाळके, नामदेव बोरुडे, प्रियंका मिसाळ, विजया शिंदे, सीताराम गागरे, संजय गायके,
गणेश बोबडे, राजू परदेशी, दत्तात्रय गडाख, तज्ञ संचालक दत्तात्रय वाघूले, भाऊसाहेब शेळके व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेची सांगता राष्ट्रगिताने झाली.