निवडणुकीला दहा महिने उरले असतानाच डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- निवडणुकीला दहा महिने उरले असतानाच डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष श्यामराव निमसे यांनी राजीनामे दिले.

श्रेष्ठींच्या निर्णयानंतर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नावावर चार दिवसांनी शिक्कामोर्तब होईल. चार दिवसांपूर्वीच दिलेले राजीनामे सोमवारी कारखाना कार्यस्थळावर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले.

जिल्हा बँकेचे कर्ज व इतर कोट्यवधींची देणी थकल्याने कारखाना २०१२-१३ ते २०१५-१६ या कालावधीत बंद होता. १६ जून २०१६ रोजी झालेल्या

निवडणुकीत माजी आमदार शिवाजी कर्डिले व डाॅ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन आघाडीचे १९ संचालक निवडून आले.

जिल्हा बँकेच्या कर्जाचे पुनर्गठण करत, तसेच राज्य शासनाची मदत घेत २०१७ मध्ये गळीत हंगाम सुरू झाला. अध्यक्ष पाटील, उपाध्यक्ष निमसे यांनी ऊस उत्पादक शेतकरी,

संचालक मंडळ व कामगारांच्या मदतीने लागोपाठ दोन गळीत हंगाम यशस्वी केले. २०१९ मध्ये उसाची टंचाई असल्याने गळीत हंगाम बंद ठेवण्यात आला होता.

यंदा १२ लाख टन ऊस उपलब्ध असल्याने गळीत सुरू होणे गरजेचे होते. मात्र, पुन्हा कर्जाचा प्रश्न उपस्थित झाल्याने कर्जाचे पुनर्गठण करण्यात यश मिळाले.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24