अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : श्रीगोंदे तालुक्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाचे आगमन झाल्याने बाजरी, कापूस, मूग, उडीद, मका, ताग व तुरीची पेरणी वेळेवर झाली.
पेरणीनंतर ठरावीक अंतराने पाऊस होत गेल्याने पिके बहरली आहेत. राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्याने द्राक्ष, डाळिंब व इतर फळे शेतकऱ्यांना मातीमोल भावात विकावी लागली होती
तयार माल बाजारपेठेत न गेल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. मात्र, या वर्षी तालुक्यात पावसाने वेळेवर, तसेच जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा उन्हाळ्यातही पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राखली गेली. कुकडी व घोड धरणांमुळे राज्यात सर्वाधिक ७३ टक्के सिंचनक्षेत्र असलेल्या
श्रीगोंद्याला आवर्तनाच्या राजकीय सावळागोंधळामुळे नेहमीप्रमाणे झळ सोसावी लागली. मात्र, पावसाने हजेरी लावत बळीराजाचे दु:ख हलके केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews