थोरात सह. साखर कारखान्याचे काम उत्कृष्ठ – जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- सहकार चळवळीतून ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण झाली असून कायम उच्चांकी भाव देत सभासद, कामगार व शेतकर्‍यांचे हित जपणार्‍या व सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे काम उत्कृष्ठ असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

सन 2020 – 21 या गळीत हंगामातील पहिल्या 111 साखर पोत्यांचे पूजन नूतन अधिकार्‍यांच्या उपस्थितीत करण्यात आले असून यावेळी अहमदनगर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ हे होते.

तर व्यासपीठावर मावळते जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी जिल्हाधिकारी संदीप निचित, तहसीलदार अमोल निकम, बाजीराव पा.खेमनर, शिवाजीराव थोरात, अमित पंडीत, सौ.मिराताई शेटे, सौ.सुनंदाताई जोर्वेकर, सौ.निर्मलाताई गुंजाळ, हौशीराम सोनवणे, कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. भोसले म्हणाले कि, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम उच्चांकी भाव देताना सभासद व कामगारांचे हित जोपासले आहे. यावर्षी कोरोनाचे संकट व आर्थिक मंदी असतानाही एफआरपीपेक्षा जास्त भाव देत कामगार यासाठी 20 टक्के बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले आहे.

तसेच शेतकर्‍यांना परतीच्या ठेवीवर व्याजही दिले आहे. या कारखान्याचा हंगाम नुकताच सुरू झाला असून नवीन उत्पादित झालेल्या 111 साखर पोत्यांचे पूजन हा दुग्धशर्करा योग असून सामान्य जनतेच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय 24 तास सुरु राहील असेही ते म्हणाले.

यावेळी बाबा ओहोळ म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्त्वांवर या कारखान्याची वाटचाल सुरू असून ना.बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याने सातत्याने तालुक्याच्या विकासात योगदान देताना सभासद शेतकरी ,कामगार या सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम केले आहे.

नवीन कारखाना व तीस मेगावॅट वीज निर्मिती हा प्रकल्प रायसाठी आदर्श ठरला असून या हंगामात उच्चांकी गाळप होईल असा विश्वास व्यक्त केला यावेळी गणपतराव सांगळे, चंद्रकांत कडलग, संपतराव गोडगे, रोहिदास पवार, मिनानाथ वर्पे, रमेश गुंजाळ, भाऊसाहेब शिंदे, डॉ.तुषार दिघे,

इंद्रजित खेमनर, माणिकराव यादव, बाळासाहेब एरंडे, सुभाष सांगळे, अ‍ॅड.नानासाहेब शिंदे, दत्तात्रय खुळे, किरण कानवडे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरोळे, प्रशांत शेंेडे आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सुत्रसंचलन नामदेव कहांडळ तर आभार संतोष हासे यांनी मानले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24