अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे देशभरातील धार्मिक स्थळे गेली अनेक महिने बंद ठेवण्यात आली होती.
तसेच राज्यातील धार्मिक स्थळे देखील बंद ठेवली होती, मात्र नुकतेच दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारने मंदिरे खुली केली आहे. मात्र कोरोनामुळे अद्यापही मंदिरांमध्ये अपेक्षित भाविकांची गर्दी जमा होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
यातच नेवासा तालुक्यातील जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर हे देवस्थान देखील खुले करण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुजासाहित्य थेट शनिमुर्तीपर्यंत नेण्यास बंदी आहे.
सहा हजार भाविकांना दर्शनासाठी परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र, चार हजारांच्या आतच भाविक येत आहेत. सध्या काही हॉटेल वगळता सर्वच दुकाने सुरु झाले आहेत.
शिर्डीत भाविकांसाठी रेल्वे सुविधा सुरु न झाल्याने खासगी वाहनातून भाविक येत नाहीत. परिणामी पुजासाहित्य विक्रेते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
दुकानांचे दररोजचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार यांचा आर्थिक ताळमेळ बसविणे आता विक्रेत्यांना मोठे जिकरीचे जात आहे. सध्या भाविकांच्या गर्दीचा ओघ कमी असल्याने धंद्याचा ताळमेळ बसत नसल्याचे व्यावसायिक म्हणू लागले आहे.
कोरोना स्थिती लक्षात घेवून भाविक पुजासाहित्य घेत नाही. अनेक जण तर चहा, नाश्ता व पाणी सुध्दा घेणे टाळत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
असेच चित्र अजूनही सुरु राहिल्यास तर भविष्यात या विक्रेत्यांवर उपासमारीचे वेळ ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved