अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील एका महिलेचा कोरोना अहवाल येण्याअगोदरच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेच्या मृत्यू कोरोनामुळे झाला की नाही हे अहवाल आल्यानंतरच कळू शकणार आहे.
महिलेस त्रास होत असताना तिला तपासणीसाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथून तिला नगर येथे पाठविले असता तिचा स्त्राव घेवून तिची तपासणी करण्यात आली.
मात्र अहवाल येण्याअगोदरच तिचा मृत्यू झाला. दरम्यान, श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.
काल पुन्हा नव्याने चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.आता तालुक्यात 143 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या झाली असून तालुक्यातील 90 अहवालाची प्रतिक्षा आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com