Ahmednagar News : एसटी बसने मोटारसायकलला धडक दिल्याने महिला जागीच ठार

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : भरधाव एसटी बसने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली. काल गुरूवारी (दि. ९) सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्याजवळ ही घटना घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावरील तालुक्यातील हिवरगाव पावसाजवळ असलेल्या टोल नाक्याजवळून प्रकाश कारखिले व रेखा साबळे हे आपल्या मोटारसायकलवरून (क्रमांक एमएच १७ एपी ७७३८) जात होते.

या ठिकाणी ते रस्ता ओलांडत असताना संगमनेरकडून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या एसटी महामंडळाच्या शिवाई बसने (क्रमांक एम एच २१ व्ही एफ ९१९३) या मोटरसायकलला धडक दिली.

या अपघातामध्ये मोटरसायकलवर बसलेल्या रेखा साबळे (राहणार जेल रोड,नाशिक ) या महिलेच्या डोक्यावरून बस गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल नारायण ढोकरे, सोनवणे व श्री काळे हे त्वरित अपघातस्थळी पोहोचले.

त्यांनी रस्त्यावर पडलेली मोटारसायकल बाजूला करून रस्ता वाहतुकीला मोकळा करून दिला. घटनेची माहिती समजताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी गेले. या ठिकाणी अपघाताचा पंचनामा करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe