अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- मी अप्पांना ओळखतो, माझ्या मुलीचे लग्न आहे. तुमच्या गळयातील गंठणासारखे गंठण माझ्या मुलीसाठी तयार करायचे आहे
असे सांगत पारनेर शहरातील संभाजीनगरमधून महिलेचे दोन तोळयाचे गंठण पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामटयांनी लांबविल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दोघे भामटे पारनेर शहरातून सुपे रस्त्याच्या दिशेने आले.
परीधान कलेक्शन पासून पुढील एका इमारतीमध्ये जाउन तेथे शिंदे आहेत का याची चौकशी त्यांनी केली. शेजारच्या इमारतीतही त्यांनी तिच चौकशी केली. त्याच दरम्यान कांताबाई दरेकर वय ६५ या धान्य आणण्यासाठी शहरात निघाल्या होत्या. पारनेर महाविदयालयाच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांना गाठून अप्पा कुठे आहेत.तुम्ही जुन्या वाडयात राहता.
अप्पा आमचे स्नेही आहेत. मुलीचे लग्न आहे. तुम्हाला लग्नाला यावे लागेल. आमंत्रण दयायला तसा घरी येईलच अशी बतावणी करीत दोघांपैकी एकाने कांताबाईंचा विश्वास संपादन केला.मुलीला लग्नासाठी गंठण तयार करायचे असे सांगत तुमच्या गळयातील गंठणाप्रमाणे गंठण करावे असे मला वाटते.
असे सांगत त्याने समोर फोन करून जुन्या पद्धतीचे गंठण चालेल का अशीही विचारणा केली. पुढे कांताबाई यांना गळयातील गंठण काढून देण्यास भाग पाडून त्यातील मनी मोजण्याचा बहाणा भामटयाने केला. आम्ही शेजारच्या परिधान कलेक्शनमध्ये आहोत.
तेथे गंठण दाखवून आणतो असे सांगत दोघा भामटयांनी पल्सरला किक मारून ते पुन्हा पारनेरच्या दिशेने पसार झाले. आपले गंठण लांबविण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर भामटयांनी सांगितल्याप्रमाणे ते खरोखर परिधान कलेक्शनमध्ये आहेत
का याची खातरजमा कांताबाई यांनी तेथे जाउन केली, मात्र तेथे ते फिरकलेही नव्हते. त्याच वेळी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. कांताबाई यांच्याशी तब्बल ११ मिनीटे त्यांनी चर्चा केली व गंठण लांबविल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. दिवसा ढवळया घडलेल्या या चोरीमुळे पारनेर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved