दारू विक्री रोखण्यासाठी महिलांचा ठिय्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत पवार यांनी जोगेवाडीतील अवैध दारु विक्रेत्यांना आजच अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

जागेवाडी गावातील मिरा बडे, वैशाली बडे, गंगुबाई आंबिलढगे, सरस्वती बडे, कुसुम ढाकणे, उषा बडे, मंखाबाई सारुक, सविता बडे, रामनाथ बडे, सुर्यकांत बडजे, राजेंद्र आंबिल ढगे यांच्यासह महिलांनी जोगेवाडीत अवैध दारु विक्री करणाऱ्यावर करावाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. तरीही गावात रासरोस दारुविक्री होते आहे.

रोज दारुड्याकडुन त्रास होत असल्याने संतप्त महिलांनी मंगळवारी चौकात रास्तारोको अंदोलन केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत पवार यांनी आंदोलक महिलांशी चर्चा केली. पोलिसांचे पथक आजच अवैध दारु विक्रेत्याविरुद्ध कारवाई करील असे पवार यांनी सांगितले.

यावेळी बोलताना मिरा बडे म्हणाल्या, गावात दारुविक्री केली जाते. पोलिसांना सांगुनही कारवाई होत नाही. महिलांना रस्त्यावरुन चालणे अवघड झाले आहे. अनेकांचे संसार रस्त्यावर आलेत. पोलिस अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यावर दखल घेतली पाहीजे. आता पाथर्डीत आंदोलन केले कारवाई झाली नाही तर जिल्हा पोलिस प्रमुखाकडे जाऊ.

गावात दारु पिणाऱ्यांना सुद्धा महिला धडा शिकवतील. असा इशारा या वेळी दिला.जोगेवाडी गावात अवैध दारु विक्री होते आहे. पोलिसांना सांगुनही दारुविक्री होतेच आहे. त्यामुळे त्रासलेल्या महिलांनी मंगळवारी पाथर्डीत रास्ता रोको आंदोलन केले.

सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत पवार यांनी जोगेवाडीतील अवैध दारु विक्रेत्यांना आजच अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. जागेवाडी गावातील मिरा बडे, वैशाली बडे, गंगुबाई आंबिलढगे, सरस्वती बडे, कुसुम ढाकणे, उषा बडे, मंखाबाई सारुक, सविता बडे, रामनाथ बडे, सुर्यकांत बडजे,

राजेंद्र आंबिल ढगे यांच्यासह महिलांनी जोगेवाडीत अवैध दारु विक्री करणाऱ्यावर करावाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. तरीही गावात रासरोस दारुविक्री होते आहे. रोज दारुड्याकडुन त्रास होत असल्याने संतप्त महिलांनी मंगळवारी चौकात रास्तारोको अंदोलन केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत पवार यांनी आंदोलक महिलांशी चर्चा केली.

पोलिसांचे पथक आजच अवैध दारु विक्रेत्याविरुद्ध कारवाई करील असे पवार यांनी सांगितले. यावेळी बोलताना मिरा बडे म्हणाल्या, गावात दारुविक्री केली जाते. पोलिसांना सांगुनही कारवाई होत नाही. महिलांना रस्त्यावरुन चालणे अवघड झाले आहे. अनेकांचे संसार रस्त्यावर आलेत.

पोलिस अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यावर दखल घेतली पाहीजे. आता पाथर्डीत आंदोलन केले कारवाई झाली नाही तर जिल्हा पोलिस प्रमुखाकडे जाऊ. गावात दारु पिणाऱ्यांना सुद्धा महिला धडा शिकवतील. असा इशारा या वेळी दिला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24