अहमदनगर बातम्या

वांबोरी चारी टप्प्याचे लवकरच काम सुरु : माजीमंत्री शिवाजी कर्डिले

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील १० व नगर तालुक्यातील २ अशा १२ गावांसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारी टप्पा २ या योजनेच्या कामाचे टेंडर नोव्हेंबर महिन्यात काढले जाणार असून, या भागातील डोंगर पट्ट्यातील जनतेला दिलेला शब्द निश्चितच या योजनेला अंतिम मंजुरी देवून पूर्ण केला जाईल, त्याचबरोबर वांबोरी चारीचे पाणी प्रत्येक लाभधारक तलावात पोहोचवले जाईल, अशी ग्वाही माजीमंत्री शिवाजी कर्डिले यांनी दिली.

पाथर्डी, राहुरी, नगर, नेवासा, तालुक्यांतील सुमारे ४५ गावांतील १०२ पाझरतलावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीला मुळा धरणातून पाणी सोडण्यात आले असून हे पाणी पाथर्डी तालुक्यातील शिराळ, लोहसर, जोहारवाडी, सातवड, या भागातील लाभधारक पाझरतलावांत पोहोचले असून,

दोन दिवसापूर्वी जोहारवाडी येथील पाझर तलावात पोहोचलेल्या पाण्याचे जलपूजन खा. सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते करण्यात आले.

वांबोरी चारी योजनेंतर्गत येणाऱ्या प्रत्येक लाभधारक पाझर तलावात पाणी पोहचवण्याची जबाबदारी आमची असून, निश्चितपणे प्रत्येक लाभधारक पाझरतलावात पाणी पोहोचणार आहे. शेतकऱ्यांनी चिंता करू नये, दहा- पंधरा दिवसांत मिरी लाईनलादेखील वांबोरी चारीचे पाणी सोडले जाणार असून,

टेलच्या तलावापर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे, त्यामुळे वांबोरी चारीचे पाणी निश्चित लाभधारक शेतकऱ्यांना दिले जाईल, असा विश्वास खा. विखे, कर्डिले व आमदार राजळे यांनी लाभधारक शेतकऱ्यांना दिला.

या वेळी तालुका दूध संघाचे अध्यक्ष सुरेश पवार, माजी चेअरमन तुकाराम वांढेकर, चेअरमन संतोष ससे, रवींद्रदेवा जोशी, किरण वांढेकर, अनिल दानवे, बाळासाहेब वांढेकर, अनिल वांढेकर, विठ्ठल वाढेकर, विठ्ठल सावंत, दादासाहेब वांढेकर, अशोक सावंत, भगवान गायकवाड, बाबासाहेब चव्हाण,

शिवचरण आगळे, सुनील गायकवाड, राजीव गायकवाड, चंद्रकांत वांढेकर, किशोर सावंत, बबनराव वांढेकर, मोहन दानवे,म्हातारदेव दानवे, किशोर सावंत, मिठू मगर, सोमनाथ फुलारे, पांडुरंग फुलारे, अशोक वांढेकर, देविदास सावंत, योगेश सावंत, सोमेश्वरवांढेकर, विशाल दानवे, राजू साळवे, भारत गायकवाड आदी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office