अहमदनगर Live24 ,18 जून 2020 : कर्जत तालुक्यातील खेड येथील कर्जत-बारामती राज्यमार्गाची प्रचंड दुर्दशा झाली असून,या ठिकाणाहून प्रवास करणे म्हणजे एक मोठे दिव्यच म्हणावे लागेल.
पावसामुळे या रस्त्यावरील दगड-गोटे उघडे पडले असून खड्ड्यांत पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे या राज्यमार्गाची तत्काळ दुरुस्ती करावी.अशी मागणी केली जात आहे.
तसेच काही दिवसांपासून हे काम थांबल्याने या रस्त्याच्या कामाला ग्रहण लागले आहे कि काय असा प्रश्न उभा राहतो. खेडपासून पुढे राशीनपर्यंत सुमारे पंधरा किमीच्या अंतरापर्यंत जागोजागी रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
मात्र, खेड या ठिकाणी रस्त्यात खडडे आहेत की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न प्रत्येक वाहनचालकाला पडतो. अनेक महिन्यांपासून या मार्गाचे काम सुरू आहे, मात्र काही दिवसांपासून हे काम थांबल्यामुळे वर्दळीच्या असलेल्या या रस्त्याच्या कामाला ग्रहण लागले आहे .
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews