अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :-महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने राज्यव्यापी काम बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद समोर निदर्शने करण्यात आली.
तर ग्रामपंचायत कर्मचार्यांचे पगारसाठीची जाचक अट असलेला 28 एप्रिल 2020 चा शासन निर्णय त्वरीत रद्द करण्याची मागणी करण्यात आली.या आंदोलनात महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अॅड.कॉ. सुधीर टोकेकर, भाकपचे राज्य सहसचिव अॅड.कॉ. सुभाष लांडे, बाळासाहेब लोखंडे,
यशराज शिंदे, शिवाजी शिर्के, सतीश पवार, पंडित माने, अलका भिंगारदिवे, मंदा गायकवाड, आशा जाधव, सतीश आव्हाड, अजित आव्हाड, राहुल चव्हाण आदिंसह ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत आंदोलन करुन,
ग्रामपंचायत कर्मचार्यांनी एक दिवसीय काम बंद ठेवले. या काम बंद आंदोलनात जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. ग्रामपंचायत कर्मचार्यांसाठी करवसुली व उत्पन्नाची जाचक अट असलेला28 एप्रिल 2020 शासन निर्णय त्वरित रद्द करून
सर्व ग्रामपंचायत कर्मचार्यांना किमान वेतनासाठी ग्रामपंचायत कर्मचार्यांना 100 टक्के अनुदान द्यावे व वेतन, पेन्शन, सुधारित किमान वेतन त्वरित लागू करण्यासह इतर प्रलंबीत मागणीसाठी मागील अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरु आहे.सदरील मागण्यांसाठी 10 जुलै 2020 रोजी राज्यभर आंदोलन करण्यात आले होते.
परंतु शासनाने याची देखील दखल घेतलेली नसल्याने ग्रामपंचायत महासंघाच्या वतीने राज्यव्यापी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आल्याचे निवेदनात म्हंटले आहे. एप्रिल 2020 एप्रिल 2021 पर्यंत या एका वर्षासाठी 50 टक्के व 25 टक्के रक्कम उत्पन्नानुसार ग्रामपंचायतीस देण्यास सांगितले आहे.
परंतु ग्रामपंचायतीची वसुली नसल्यामुळे 50 टक्के व 25 टक्के रक्कम पगाराची देण्याची टाळाटाळ करण्यात येत आहे. म्हणून लोकसंख्येच्या जाचक आकृतीबंध अट ताबडतोब रद्द करावी, भविष्य निर्वाह निधीतील एचडीएफसी बँकेकडे असलेली तमाम महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम युनियन बँकेत ट्रान्सफर करावी
व त्याचा हिशोब प्रत्येक ग्रामपंचायत कर्मचार्यांना देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषदेत देण्यात आले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved