अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- शहरातील जुन्या-नव्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी निष्ठेने पक्षाचे काम करुन काँग्रेस संघटना बळकट करावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आ.नाना पटोले यांनी केले.
नगर शहर काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहर ब्लॉक काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष आ.पटोले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी नुकतीच भेट घेऊन शहरातील काँग्रेस स्थितीबाबत चर्चा केली. काही दिवसांपूर्वी श्री.भुजबळ यांना प्रदेश काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली होती.
या संदर्भात शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्षांशी तपशिलवार चर्चा केली. अध्यक्ष आ.पटोले यांनी सर्व बाजू समजून घेऊन शहरामध्ये पक्षाचे काम निष्ठेने करा, असे आवाहन केले. प्रदेश काँग्रेसचा ‘व्यर्थ न हो बलिदान’ हा कार्यक्रम नगर शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात आयोजित करुन
स्वातंत्र्य लढ्यात पं.नेहरुसह राष्ट्रीय बारा नेत्यांच्या किल्ल्यातील बंदीवासाच्या घटनेला उजाळ द्यावा, असा प्रस्ताव देऊन राष्ट्रीय नेते खा.राहुल गांधी यांच्यासह प्रदेशाध्यक्षांनी भुईकोट किल्ल्याला भेट देण्याचे निमंत्रण दिले. शिष्टमंडळात श्री.भुजबळ यांच्या समवेत जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस उबेद शेख,
अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान, प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, शहर सरचिटणीस अभिजित कांबळे, शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार, भिंगार महिला काँग्रेस अध्यक्षा मार्गारेट जाधव, सौ.प्रभावती क्षेत्रे, सौ.रजनी ताठे, सौ.किरणताई आळकुटे, शहर चिटणीस मुकुंद लखापती,
अजहर शेख, राजेश बाठिया, संतोष धीवर, देवदत्त भांबळ, सुभाष रणदिवे, शहर उपाध्यक्ष एम.आय.शेख, आर.आर.पाटील, रवि सुर्यवंशी, संतोष कांबळे आदि उपस्थित होते.