कामगार कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास कामगारांना न्याय मिळेल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- देशभर सध्या कृषी कायदा तसेच कामगार कायद्यावरून आंदोलने पेटली आहे. ठिकठिकाणी याचा निषेध करण्यासाठी कामगार रस्त्यावर उतरू लागले आहे.

यातच कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वराज्य कामगार संघटनेचा लढा सुरू असून कामगार कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास कामगारांना न्याय मिळेल, असे प्रतिपादन स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे यांनी येथे केले.

स्वराज्य कामगार संघटनेची आठवी सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी ते बोलत होते. या वार्षिक सर्वसाधारण सभेत शासनदरबारी व कामगारांच्या न्यायासाठी न्यायालयात दाद मागण्यासाठी विचारविनिमय करणे,

एक्साईड इंडस्ट्रिअल लिमिटेड या संस्थेतील कामगारांना कंपनीतील सेवेत सामावून घेण्याबाबत व त्यांना कायदेशीर हक्क मिळवून देण्याबाबत विचारविनिमय करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी अध्यक्ष योगेश गलांडे व सचिव आकाश दंडवते कोविड- १९ च्या काळात कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांना मार्च व एप्रिल महिन्याचे पूर्ण वेतन मिळवून दिल्याबद्दल सभासदांनी त्यांचे आभार मानले.

योगेश गलांडे म्हणाले, कामगार कायद्याच्या वापरामुळे कामगारांना न्याय मिळतो. कामगार व उद्योजक यांच्यामध्ये समन्वय ठेवल्यामुळे उद्योगात प्रगती होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24