अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- कोरोना महामारी ने संपूर्ण जगाला वेठीस धरले असताना आता कोरोना बरोबरच बर्ड फ्लू चे ही संकट भारता समोर उभे ठाकले आहे.तेव्हा या बर्ड फ्लू चा शिरकाव हा नुकताच अहमदनगर जिल्ह्यामध्ये झाला आहे.
कोरोनानंतर आता बर्ड फ्लू आल्याने भीती पसरली आहे राज्यातील अनेक भागात बर्ड फ्लूने थैमान घातलेले असताना, बर्ड फ्लू नगर तालुक्यात दाखल झाला आहे. दोन दिवसांत आठवड, तसेच निंबळक परिसरात १६२ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.
दोन दिवसांत आठवड येथे ११६ व निंबळक येथे ४६ कोंबड्या मृत पावल्या. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. बाराबाभळी येथे साळुंकी मृत अवस्थेत आढळली, तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे गावात कुक्कटपालन फार्मवर फवारणी करण्याचे काम चालू आहे.
अहमदनगर शहराजवळ पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निंबळक (ता. नगर) येथे काल राम चव्हाण यांच्या ४६ कोंबड्या मृत अवस्थेत पडल्या. याची माहिती मिळताच पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने पाहणी केली असता ४६ कोंबड्या मृत अवस्थेत आढळल्या.
त्यातील पाच कोंबड्या तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आल्या आहेत. अहवाल अद्याप मिळाले नाही. या परिसरातील एक किमी अंतरावर पाहणी केली.
अहवाल पॉझिटिव्ह आला, तर परिसरातील दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या परिसरात पाहणी करून कोंबड्यांचे शेड, कुक्कुटपालन या परिसरातील सर्व ठिकाणी फवारणी करण्यात येणार आहे.