चिंताजनक! ‘हा’तालुका @ २२३; आणखी 16 लोकांना कोरोना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा जणू विस्फोट झाला आहे. संगमनेरमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण लक्षणीय आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा हा मतदारसंघ असून कोरोनाची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

काल नव्याने 16 कोरोना बाधित आढळून आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 223 झाली आहे. शहरातील पंजाबी कॉलनी 63 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष, 58 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला,

25 वर्षीय महिला, खांडगाव येथील 18 वर्षीय तरुण, नान्नज येथील 46 वर्षीय महिला व 46 वर्षीय पुरुष, संगमनेरातील नवघर गल्ली येथील 60 वर्षीय पुरुष,

चिखली येथील 38 वर्षीय महिला, खासगी लॅबकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार गुंजाळवाडी विठ्ठल नगर येथील 40 वर्षीय पुरुष, घुलेवाडी-समनापूर रोडवरील 36 वर्षीय पुरुष, निमोण येथील 50 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष,

मालदाडरोड भारतनगर येथील 52 वर्षीय पुरुष, एकता चौक येथील 49 वर्षीय पुरुष असे 16 व्यक्तींचे करोना पॉझिटिव्ह अहवाल स्थानिक प्रशासनास प्राप्त झाले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24