अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- सध्या सगळीकडेच कोरोनाने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अहमदनगर जिल्ह्यात देखील रुग्णासंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात बुधवारी नव्याने 448 कोरोनाबधित रुग्णांची भर पडली आहे.
तर सुमारे 2 हजार बधितांवर उपचार सुरू आहेत. सध्या मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र 97.55 वर घसरल्याने चिंतेत भर पडली आहे. दरम्यान कोरोनाच्या या लाटेत जिल्ह्यत प्रचंड वेगाने वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनली आहे.
मागील 24 तासांमध्ये जिल्ह्यात या लाटेतील सर्वाधिक 448 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 144 रुग्ण हे नगर शहरात आढळले आहेत.
तर राहता 52, नगर ग्रामीण 35, पाथर्डी 28, अकोले 26,श्रीरामपूर 20, कोपरगाव 15, राहुरी 15, भिंगार काँटोंमेंट 14, पारनेर 13, श्रीगोंदा 10, संगमनेर 9, नेवासा 8, शेवगाव 8, कर्जत 5, जामखेड 1 असे रुग्ण आढळले आहेत. तर इतर जिल्ह्यातील 22 आणि इतर राज्यातील 16 रुग्णांचा समावेश आहे.
संभाव्य लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठक घेऊन सर्व तालुक्यातील लसीकरण आणि कोरोना चाचण्या वाढवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
संबंधित सर्व यंत्रणांनी आपापल्या क्षेत्रात नियमांची कडक अंबलबजावणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या आहेत.
जिल्ह्यात या आठवड्यात झपाट्याने रुग्ण वाढत असून, मागील 2 आठवड्यांच्या तुलनेत या आठवड्यातील रुग्णांचा आकडा हा अधिक आहे. मागील आठवड्यात रोज 70 ते 80 नव्या रुग्णांची नोंद होत होती.
तर उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आकडा हा 400 च्या आसपास होता. परंतु आता दैनंदिन रुग्णसंखेने 400 टप्पा ओलांडला असू, उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ही 2 हजारांवर पोहचली आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे अद्याप तरी गंभीर रुग्ण संख्या कमी आहे.