अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. राहुरी तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचे रुग्ण आहेत.
तालुक्यात काल शनिवारी कोरोनाचा उद्रेक झाला. दिवसभरात सुमारे 63 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात राहुरी शहरातही काल 37 जणांना करोनाची बाधा झाली.
त्यामुळे तालुक्यात बाधितांनी संख्या 631 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 22 जणांचे बळी गेले आहेत. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरात 37, राहुरी विद्यापीठ 2, टाकळीमिया 3, कोंढ़वड 1, तमनर आखाडा 1,
गडधे आखाडा 3, देवळाली प्रवरा 2, राहुरी फॅक्टरी 1, वांबोरी 3, ब्राम्हणी 4, उंबरे 3, सोनगांव 1, रामपूर 1, केसापूर 1 अशा 63 जणांना करोनाची बाधा झाली आहे.
दरम्यान, बाधितांची संख्या वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे सर्वानी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved