अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- सरकारी अधिकारी म्हंटले कि जनमानसात एक संतापाची भावना असते. सरकारी कार्यालयात कधीही कामानिमित्त जा, काम तर लवकर होतच नाही, मात्र खेट्या मारून मारून नागरिक मात्र परेशान होतात.
मात्र आज एक तहसीलदार साहेबांनी केलेले काम ऐकून तुम्ही पण म्हणतात व्वा साहेब… श्रीरामपूर तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत असलेली एक ज्येष्ठ महिला तळमजल्यावर बसलेली होती. तहसीलदार प्रशांत पाटील हे कार्यालयात आले जिन्याच्या पाय-या चढत असाताना त्यांनी त्या महिलेस पहिले.
तिची विचारपूस केली. त्या आजीबाईंनी मला डोल मिळत आहे, परंतु काही कागदपत्रे जमा केली नाही तर तो बंद होईल, असा निरोप आल्यामुळे गावातून आले. तहसीलदार पाटील यांनी तातडीने संजय गांधी निराधार योजनेचे काम पाहत असलेल्या अधिकाऱ्यांना खाली बोलविले अन् सर्व कागदपत्रांची पूर्तता बघून घेण्यास सांगितले.
पाटील फक्त आदेश देऊन तेथून निघाले नाही. तर त्या आजींचे संपूर्ण काम होईपर्यंत तहसीलदार पाटील स्वतः तिथेच उभे राहिले. आजींकडे गावी जाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते, आजीनी पाटील साहेबांना आवाज दिला व गावी जाण्यासाठी काही पैसे मिळतील का अशी विचारणा केली असता
पाटील साहेबांनी लगेच 500 रुपयांची न आजीबाईंना देऊ केली. अन् क्षणाचाही विचार न करता कार्यालयात गेले. हे सर्व तिथे उभे असलेले नागरिक पाहत होते. पाटील गेल्यानंतर एकाने ‘त्या’ आजीबाई जवळ जावून विचारले आजी तो माणूस कोण होता माहिती आहे का? त्यावर आजींनी नाही माहित म्हणत कोण होते असे विचारले.
त्या व्यक्तीने सांगितले ते तालुक्याचे तहसीलदार प्रशांत पाटील आहे. तहसीलदार स्वतःच होते हे ऐकताच आजींच्या डोळ्यात खळकन पाणी आले. अन् आजीबाई इतकच म्हणाल्या त्यांच्या रुपात माझा देवच आला होता. मला मदत करायला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved