अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- महापालिका आरोग्य विभागाची राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहीम कार्यक्रमांतर्गत पोलिओ टास्क फोर्सची बैठक नुकतीच झाली.
यावेळी शासनाने दिलेल्या उद्दीष्टांपेक्षा अधिक लसीकरण करण्याच्या सूचना आयुक्त शंकर गोरे यांनी दिल्या. आयुक्त गोरे म्हणाले, दि२३ जानेवारीला होणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त पल्स पोलिओ लसीकरण करण्यासाठी मनपा आरोग्य विभागाने प्रयत्न करावेत.
नवी पिढी सुरक्षित, सुदृढ आणि सशक्त होण्यासाठी लसीकरण प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. यासाठी सूक्ष्म नियोजन करून तयारी करावी.
तसेच कोरोना नियमावली संदर्भातही यावेळी सूचना देण्यात आल्या. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.राजूरकर यांनी लसीकरण मोहिमीची माहिती दिली.
दि२३जानेवारीच्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत बायव्हायलंट लसीचा वापर करण्यात येणार आहे. पाच वर्षांखालील ४५ हजार ४७३ बालकांच्या लसीकरणाचे उद्दीष्ट असलेली
ही मोहीम १०० टक्के यशस्वी करण्यासाठी पोलिओ रविवार बूथ व त्यांनतर पाच दिवस घरभेटीचे तसेच ट्रान्झिट, मोबाईल व नाईट टीमचे आयोजन करण्यात येत आहे.
दि.२४ ते २८ जानेवारीला वंचित बालकांसाठी घरोघरी लसीकरण तसेच झोपडपट्टी, बांधकामे, विटभट्टया, पेरीअर्बन एरिया येथे लसीकरण होणार आहे.