अहमदनगर बातम्या

आठवडे बाजार सुरू करण्यासाठी ‘या’ नगरपालिकेच्या गेटला ठोकले कुलूप !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आठवडे बाजार सुरू झालेले असताना देवळाली प्रवरा शहरातील आठवडे बाजार सुरू न केल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या गेटला कुलूप लावून आंदोलन करण्यात आले.

सध्या राज्यभरातील सर्वच ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला असून जवळपास सर्वच व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत.

मात्र अद्यापही ग्रामीण भागातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा व आर्थिक उलाढालीचा प्रमुख स्त्रोत असलेले आठवडे बाजार अद्यापही सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली नाही.

त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झालेली आहे. या पार्श्वभुमीवर आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली देवळाली प्रवरा नगरपालिका प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात आले.

यावेळी दर शनिवारी भरणारा देवळाली प्रवराचा आठवडे बाजार सुरू करा, अशी मागणी करण्यात आली. संतप्त आंदोलनकर्त्यांनी नगरपालिकेच्या गेटला कुलूप ठोकले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office