‘या’ आमदाराने रिक्षा चालवून दिले विरोधकांना उत्तर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :  अहमदनगर : कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांची मागील काही दिवसांपासून मतदारसंघात जोरदार बॅटिंग सुरु आहे.

यात थेट नगराध्यक्षांनाच राष्ट्रवादीत आणण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. सध्या आ.पवार हे मतदारसंघातील दौर्‍यावर असून यादरम्यान त्यांनी रिक्षा चालवण्याची मजा घेतली. कार्यकर्त्यांना रिक्षात मागे बसवून त्यांनी काही अंतरापर्यंत रिक्षाचे सारथ्य केले.

रिक्षा चालवण्याच्या अनुभवाबाबत आ.पवारांनी अतिशय मार्मिक व्टिट करून विरोधकांची फिरकी घेतलीय. ‘ सरकार स्थापन झालं तेंव्हा हे तीन चाकांचं सरकार असून ते कसं चालणार? अशी शंका विरोधकांनी उपस्थित केली होती. पण सरकारचा लोकांच्या हिताचा कारभार चांगला सुरुच, राहिला प्रश्न तीन चाकांच्या रिक्षाचा.

तर ही रिक्षा चालवणंही सहजसोपं असून याचा अनुभव आज मी माझ्या मतदारसंघात घेतला.’ अशा शब्दात आ.पवारांनी आपला अनुभव शेअर केला आहे. या रिक्षा चालविण्याचा विडिओ सोशेल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24