अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची कॅबिनेट मंत्रीपदाची एक जागा रिकामी झाली आहे. आगामी मंत्रिमंडळात विस्तारात राष्ट्रवादी कडून ही जागा भरली जाणार आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हा विस्तार होऊ शकतो. यात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळून त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळू शकते अशी माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
तसेच आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर एक स्टेट्स ठेवले आहे. त्यामुळे याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहविभागाची धुरा दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे वळसे पाटील यांच्याकडे पूर्वी असलेले कामगार आणि उत्पादन शुल्क ही खाती रोहित पवार यांच्याकडं दिली जाण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरकडे दुर्लक्ष होत असल्याचं सांगत अहमदनगरचे पालकमंत्रीपदास आपण वेळ देऊ शकत नसल्याचे हसन मुश्रीफ यांनी यापूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे पालकमंत्रीपदाची जबाबदारीही आ रोहित पवार यांच्याकडे दिली जाण्याची शक्यात सूत्रांनी वर्तवली आहे.