अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील आठवडे बाजार रविवारी राहणार बंद…!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News: ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल २०३ ग्रामपंचायतीची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे.

या निवडणुकीमुळे त्या-त्या गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्यास सुरुवात झाली असून आज अर्ज माघारी घेण्यासाठीची मुदत आहे. त्यामुळे आज कोण कोण या राजकीय आखाड्यात उतरून आपले नशीब आजमावत आहे ते समजेल.

या रणधुमाळीत नगर तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि.१८ डिसेंबर, २०२२ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

मात्र काही गावातील मतदान व आठवडे बाजार एकाच दिवशी असल्यामुळे या ठिकाणी मोठया प्रमाणावर होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी उप विभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी कायद्याच्या तरतुदी अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करून अहमदनगर तालुक्यातील मौजे जखणगांव,

सारोळा कासार व सोनेवाडी चास या गावातील दि१८ डिसेंबर,२०२२ रोजी भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे या दिवशी आठवडे बाजारात विक्रीसाठी शेतकरी व व्यापारी यांनी साहित्य घेऊन येऊ नये. असे आव्हान करण्यात आले आहे.